पुणे : गतिरोधकांमुळे वाहनांचा वेग मंदावला | पुढारी

पुणे : गतिरोधकांमुळे वाहनांचा वेग मंदावला

पौड, पुढारी वृत्तसेवा : भूगाव येथे झालेल्या रस्त्यावर गतिरोधक टाकले आहेत, परिणामी वेगाने धावणा-या वाहनांचा वेग कमी झाला असून ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश आले.

पुणे- कोलाड राष्ट्रीय महामार्गावर भूगाव हद्दीतील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ग्रामपंचायत भूगावकडून गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ व सहायक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड यांच्या सूचनेनुसार रोडवेज कंपनीने

अखेर छत्रपती श्री शिवाजी महाराज जलाशय, तांगडे वस्ती, माताळवाडी फाटा, हिरा गार्डन, सणसनगर, दौलत पेट्रोलपंप या ठिकाणी गतिरोधक बसवले आहेत. गतिरोधकांमुळे वाहनांची गती कमी होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. या वेळी सरपंच वनिता तांगडे, माजी सरपंच निकिता सणस तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Back to top button