शिक्रापूर : केंदूर-ठाकरवाडी येथे पावसाने घर कोसळले; पाच वर्षांपूर्वीही हेच घर कोसळून मुलाचा मृत्यू | पुढारी

शिक्रापूर : केंदूर-ठाकरवाडी येथे पावसाने घर कोसळले; पाच वर्षांपूर्वीही हेच घर कोसळून मुलाचा मृत्यू

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: केंदूर (ता. शिरूर) येथील ठाकरवाडी येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी समाजातील रामा रावबा गावडे यांचे घर कोसळले. दुर्दैवाने पाच वर्षांपूर्वी झालेल्या पावसामध्ये हेच घर कोसळून एका छोट्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्या वेळच्या दुर्घटनेत या मुलाची आई व आजी जखमी झाले होते, पुन्हा एकदा या कुटुंबावर हा बाका प्रसंग उद्भवला आहे. पाच वर्षांपूर्वी नुकसान भरपाईसाठी या घटनेचा पंचनामा व प्रशासनाने कार्यवाही केली होती, परंतु अध्यापही या कुटुंबाला मदत मिळू शकली नाही.

शुक्रवारी जखमी झालेल्या महिलेवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू असून, ही जागा एसईझेड क्षेत्रात येत असल्याने त्याला घरबांधणी व दुरुस्तीसाठी एसीझेडचे अधिकारी विरोध करीत आहेत. केंदूरचे सरपंच अविनाश साकोरे, उपसरपंच योगिता थिटे, माउली थिटे, सनी थिटे यांनी सदर कुटुंबाची भेट घेऊन घटनास्थळी पाहणी केली. सोमवारी तलाठी यांना सांगून पंचनामा करून या कुटुंबाला मदत करण्यासाठी कार्यवाही करणार असल्याची माहिती सरपंच अविनाश साकोरे व त्यांच्या सहकार्‍यांनी

Back to top button