पारगावला मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | पुढारी

पारगावला मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

पारगाव, पुढारी वृत्तसेवा: पारगाव (ता. आंबेगाव) येथील चिचगाई मळा परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. शाळंकरी मुले, पादचारी, दुचाकीस्वारांना या परिसरातून जाणे कठीण झाले आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पारगाव ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. चिचगाई मळा भागात गेली अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.

या कुर्त्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाला गुरुवारी (दि. 21) निवेदन देण्यात आले. या वेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर अस्वारे, पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल सीताराम ढोबळे यांच्यासह विस्तार अधिकारी आर. सी. हुजरे, पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. डी. साळवे, डॉ. कवडे उपस्थित होते.

Back to top button