पुणे : समाविष्ट गावांमधील 4,881 खड्डे बुजवलेच; महापालिका प्रशासनाचा दावा | पुढारी

पुणे : समाविष्ट गावांमधील 4,881 खड्डे बुजवलेच; महापालिका प्रशासनाचा दावा

पुणे : महापालिका हद्दीतील जुन्या व नवीन समाविष्ट गावामध्ये 4 हजार 881 खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा पथ विभागाने केला आहे. तसेच 486 चेंबर दुरुस्ती व 100 पाणी साठलेल्या ठिकाणचा पाण्याचा निचरा करण्याची कामे पूर्ण केल्याचे सांगितले. पथ विभागाकडून तीन पाळ्यांमध्ये खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. रस्ते दुरुस्तीसाठी कोल्ड मिक्स माल, कोल्ड इमल्शन, जेट पॅचर, पुनावाला यांची रस्ते दुरुस्ती मशिनरी, केमिकलयुक्त काँक्रीट, हॉट मिक्स मालचा वापर केला जात आहे.

पथ विभागाचे 7 रोलर, 15 (आर.एम.व्ही.टीम) रस्ते दुरुस्ती वाहनासोबत काम करीत आहेत. पथ विभागामार्फत 3 पाळीमध्ये भरारी पथक नेमले आहे. गुरुवारी हॉट मिक्स प्लान्टद्वारे क्षेत्रिय कार्यालयासाठी सुमारे 75 मे. टन व मुख्य पथ विभागासाठी सुमारे 300 मे. टन. डांबरी माल वापरण्यात आले असल्याचेे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

केवळ तीन खड्डे पडले
महापालिकेच्या मुख्य खात्याकडून म्हणजेच पथ विभागाकडून खासगी ठेकेदाराकडून बांधून घेण्यात आलेल्या 139 रस्त्यांवर दोष दायित्व कालावधीत (डीपीएल) 3 खड्डे पडल्याचा अजब दावा महापालिकेने केला आहे.

Back to top button