पुणे : जेजुरीत आढळला पुरुषाचा मृतदेह | पुढारी

पुणे : जेजुरीत आढळला पुरुषाचा मृतदेह

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा: जेजुरी गावच्या हद्दीत मार्तंड देवस्थानचे भक्तनिवास शेजारील भिंतीजवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह जेजुरी पोलिसांना आढळून आला आहे. जेजुरी पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी की, मयत पुरुषाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असून, या व्यक्तीचे नाव-पत्ता समजून आलेला नाही. मयताच्या अंगात फुल बाह्याचा शर्ट, त्यावर पांढर्‍या रंगाची पाने, हिरव्या रंगाची अंडरवेअर, बांधा सडपातळ आहे .

जेजुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल आहे. या मृतदेहाचे जेजुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून येथील शवागारात ठेवण्यात आला आहे. याबाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलिस स्टेशन येथे 02115/253129 यावर किंवा पोलिस नाईक धर्मवीर खांडे मो.नं 9011082328 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जेजुरी पोलिसांनी केले आहे.

 

Back to top button