पुणे : विठ्ठलवाडीत भीमा नदी तुडुंब | पुढारी

पुणे : विठ्ठलवाडीत भीमा नदी तुडुंब

तळेगाव ढमढेरे, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील भीमा नदीच्या बंधार्‍यावरून पाणी वाहू लागल्याने शिरूर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरूर) या गावानजीक भीमा नदी वाहते. शिरूर व दौंड तालुक्याला जोडणारा पूल भीमा नदीवर बंधारा आहे. या बंधार्‍यावरून दोन्ही तालुक्यांचा संपर्क होत असून, सध्या सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे येथील भीमा नदीला पूर आल्याने नदीचे पाणी बंधार्‍यावरून वाहत आहे. या बंधार्‍यावरून पाणी वाहत असल्याने प्रशासनाने पुलावरून वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून धरणक्षेत्रात झालेल्या पावसाने भीमा नदीला मोठा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पाण्याने बंधारा पूर्ण भरून असलेल्या वाहतुकीच्या रस्त्यावरून पाणी वाहत आहे. नदी कडेच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button