वालचंदनगर सहकारी बँकेवर स्वाभिमानी पॅनेलची सत्ता | पुढारी

वालचंदनगर सहकारी बँकेवर स्वाभिमानी पॅनेलची सत्ता

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा: वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर सहकारी बँकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत स्वाभिमानी सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत प्रगती पॅनेलचा पराभव केला. या बँकेची शनिवारी (दि. 9) पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सुरवातीपासून मोठी चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, सभासदांनी स्वाभिमानी सहकार पॅनेलवर विश्वास दाखवत मोठ्या मताधिक्याने सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले.

यामध्ये संतोष हनुमंत गायकवाड, विठ्ठल नामदेव चव्हाण, शरद अर्जुन चव्हाण, संदीप परशुराम फाळके, संजय नारायण भरते, शशांक सुधाकर माडगे, राजेंद्र सूर्याजी रणमोडे, विजय शिवाजी अर्जुन, विजय सोपान मस्के, जीवन लक्ष्मण भोरे, राजलक्ष्मी विष्णू दळवी व पार्वती गोविंद बनसोडे हे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत प्रगती पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. या बँकेची एकहाती सत्ता स्वाभिमानीकडे आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. पी. गावडे यांनी काम पाहिले.

Back to top button