पिंपरी : मोबाईल टॉवरच्या बॅट-या चोरीला | पुढारी

पिंपरी : मोबाईल टॉवरच्या बॅट-या चोरीला

पिंपरी : चोरट्यांनी मोबाईल टॉवरमध्ये असलेल्या बॅटर्यासह अन्य साहित्य चोरून नेले. ही घटना 7 एप्रिल ते 29 जून दरम्यान बावधन येथे घडली. अनुज बाळासाहेब मोरे (41, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन येथे वोडाफोन कंपनीचा मोबाईल टॉवर आहे. या टॉवरच्या देखरेखीचे काम फिर्यादी यांच्या कंपनीकडे आहे. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी टॉवरला लावलेली लोखंडी ट्रॉली, 20 हजारांच्या बॅटर्या, पाच हजारांची जनरेटरची बॅटरी, 10 हजारांचे पॉवर प्लांट, 50 हजारांचे डिझेल जनरेटर असा एक लाख 15 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले.

Back to top button