पिंपरी : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला | पुढारी

पिंपरी : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

पिंपरी : दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी पादचारी तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री डेअरी फार्मच्या गार्डनजवळ पिंपरी येथे घडली. संदीप आनंदराव जगदाळे (28, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगदाळे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास डेअरी फार्मच्या रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button