बारामती वनक्षेत्रात कोळसा भट्ट्यांवर कारवाई | पुढारी

बारामती वनक्षेत्रात कोळसा भट्ट्यांवर कारवाई

लोणी भापकर : पुढारी वृत्तसेवा: बारामती वनपरिक्षेत्रामधील कर्‍हावागज येथे खासगी शेतजमिनीमध्ये प्रोसोपीस प्रजातीपासून तयार करण्यात आलेला कोळसा टेम्पोमध्ये भरत असताना वनपाल तसेच वनरक्षकांनी जागेवरच पकडून चालकाविरुध्द भारतीय वन अधिनियम 1927 तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 अन्वये वन गुन्हा नोंदवून वाहन जप्त केले. लोणी भापकर येथील वनक्षेत्रालगत असणार्‍या खासगी शेतजमिनीमध्ये विनापरवानगी कोळसा भट्ट्या लावून कोळसा तयार करताना आढळून आल्याने वनरक्षक मोरगाव यांनी भारतीय वन अधिनियम 1927 तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 अन्वये वन गुन्हा नोंदविण्यात आला.

आरोपींवर दंडात्मक कारवाई केली. उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहायक वनसंरक्षक मयूर बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती शुभांगी लोणकर, वनपाल हेमंत मोरे, अमोल पाचपुते तसेच वनरक्षक बाळासाहेब गोलांडे व वनमजूर प्रकाश लोंढे यांनी ही कारवाई केली. आपणास वनक्षेत्रामध्ये कुठेही काहीही अवैध काम आढळून आल्यास या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02112-244450 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी केले आहे.

Back to top button