पिंपळे गुरव : पदपथावर व्यावसायिकांचे अतिक्रमण | पुढारी

पिंपळे गुरव : पदपथावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा :  परिसरातील पदपथांवर स्टॉलधारकांनी अतिक्रमण केल्यामुळे पायी चालणार्‍या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पिंपळे गुरव भागात छोटे व्यावसायिक दुकानं आणि खाद्य विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. पदपथच खाद्य आणि इतर विक्रेत्यांनी हडपला आहे.

पिंपळे गुरवतील काटे पुरम, बँक ऑफ महाराष्ट्र, काशी विश्वेशर शाळा परिसर, सृष्टी चौक अशा बहुतांश भागातील रस्त्याच्याकडेला पदपथ आहेत. परंतु, सध्या पथांवर स्टॉलधारकांचेअतिक्रमण वाढू लागल्याचे दिसत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट पदपथ तयार करण्यात आले आहेत. त्यावर कोटवधींचा खर्च करण्यात आला आहे. परंतु, यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्यावरुन चालावे लागत आहे.

काटे पूरम भागात आरक्षित होकर्स झोन नसल्याने पदपथावर अतिक्रमण केले जात आहे. भेळ, पाणीपुरी, वडापाव, चायनीज टपर्‍या पदपथावर दिसून येतात. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून पादचर्‍यांच्या सोयीकरिता तयार केलेले पदपथ व्यावसायिकांनी गिळकृत केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अतिक्रमण करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली
जात आहे.

Back to top button