गणपतीनिमित्त जादा रेल्वे; उद्यापासून प्रवाशांना आरक्षण मिळणार | पुढारी

गणपतीनिमित्त जादा रेल्वे; उद्यापासून प्रवाशांना आरक्षण मिळणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा; कोकणवासीयांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. या सणाला शहरात कामधंद्यासाठी आलेले कोकणवासीय कामातून वेळ काढून आवर्जून कोकणात जातात. त्यामुळे रेल्वेगाड्यांना नेहमीच गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी आणि कोकणकडे जाणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने मुंबई, पुण्यातून गणपती विशेष 74 रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व गाड्यांचे बुकिंग येत्या सोमवार (दि. 4 जुलै) पासून होणार आहे.

त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. रेल्वेकडून 21 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान विविध मार्गांवर या 74 विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. प्रवाशांना 4 तारखेपासून आरक्षण केंद्र आणि आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर तिकीट बुकिंग करता येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

पुणे स्थानकातून सुटणार्‍या गाड्यांचे वेळापत्रक
पुणे-कुडाळ रेल्वे दिनांक 23, 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर रोजी पुणे स्थानकातून रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी सुटेल, तर पुणे- थिवी/कुडाळ रेल्वे 26 ऑगस्ट आणि 2, 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुटेल.

कुडाळ स्थानकातून सुटणार्‍या गाड्यांचे वेळापत्रक
कुडाळ-पुणे रेल्वे दिनांक 23, 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर रोजी कुडाळ स्थानकातून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. तर, थिवी/कुडाळ-पुणे रेल्वे 28 ऑगस्ट आणि 4, 11 सप्टेंबर रोजी कुडाळ स्थानकातून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुटेल.

Back to top button