

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरण : पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर पेटवून घेत आत्महत्या केलेल्या सुरेश पिंगळे यांच्या आत्महत्येस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाला हे जरी तत्कालीन कारण आहे.
तथापि, त्यांच्या पिशवीत मिळून आलेल्या दोन पत्रात अनेक बाबी समोर आल्या आहेत. प्रामुख्याने त्यांच्या आत्महत्येस कौटुंबिक वादाची किनारच असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले.
पिंगळे यांच्याकडील पिशवीत दोन पत्र सापडली आहेत. त्या पत्रामध्ये कौटुंबिक समस्यांमुळे तणावाखाली असल्याचे त्याने लिहले होते, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, उपायुक्त मितेश घट्टे, सागर पाटील उपस्थित होते.
पोलिस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर पिंगळे यांनी 18 ऑगस्ट रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास हातीची नस कापून घेतल्यानंतर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतले. त्यानंतर वाचवा-वाचवा म्हणत त्यांनी थेट पोलिस आयुक्तालयात धाव घेतली.
प्रसंगावधान राखत तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी कपड्याच्या साह्याने आग विझवत त्यांना तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, गुरूवारी सायंकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुरवातीला कुटुंबियांनी विविध आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांच्याकडील पत्रात लिहलेल्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर कुटुंबियांनी रात्री मृतदेह ताब्यात घेतला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले, असे गुप्ता यांनी सांगितले.
पिंगळे यांच्याकडे असलेल्या पिशवीत पोलिसांना दोन पत्रे सापडली. त्यापैकी आठ पानी पत्रात पिंगळे यांना गेल्या सहा महिन्यांपासून कौटुंबिक वादातून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे.
कौटुंबिक वादामुळे ते तणावाखाली होते. नोकरी मिळवण्यासाठी त्यांना चारित्र्य पडताळणी दाखला मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, चुकीचा पत्ता दिल्याने त्यांना पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. प
डताळणीत पिंगळे नावाच्या दुसर्या एका व्यक्तीविरोधात कोथरूड, समर्थ, सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्यचे उघडकीस आले होते.
नाम साध्यर्मामुळे पिंगळे यांना त्रासाला सामोरे जावे लागले. आत्महत्या करण्याचा विचार येत असल्याबाबतची पाच करणे लिहली होती. त्यापैकी चारित्र्य पडतळाणीला उशीर होत असल्याचे म्हटले आहे.
शासन निर्णयानुसार तीस दिवसांच्या कालावधीत दाखला देणे बंधनकारक आहे. हे प्रकरण संवेदनशील आहे. पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे, असे सहआयुक्त डॉ. शिसवे यांनी सांगितले.
हे ही वाचलं का?
https://youtu.be/StsVFW0XFyI