पुणे : पोलीस आयुक्तालयाच्या दारात पेटवून घेतलेल्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू | पुढारी

पुणे : पोलीस आयुक्तालयाच्या दारात पेटवून घेतलेल्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू

पुणे; पुढारी ऑनलाईन :  पोलीस आयुक्तालयाच्या दारात पेटवून घेतलेल्या सुरेश पिंगळे सुरेश विठ्ठल पिंगळे (वय 42, रा. पडळवस्ती, औंध रस्ता, खडकी) यांचा मृत्यू झाला. सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांनी पेटवून घेतल्यानंतर ते जवळपास ८० टक्के भाजले होते.

सुरेश विठ्ठल पिंगळे चरित्र पडताळणीसाठी पिंगळे पोलीस मुख्यालयात बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गेले होते. पिंगळे यांनी चरित्र पडताळणीसाठी १ जुलै रोजी अर्ज केला होता, मात्र नाम साधर्म्यामुळे कोथरूड, सहकारनगर, खडकी पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल झाल्याचे पिंगळे यांना समजले.

पिंगळे खासगी कंपनीत कॉण्ट्रक्ट बेसिसवर काम करीत होते, त्यांना कामामध्ये चरित्र पडताळणीचे पत्र हवे होते. चरित्र पडताळणीसाठी पिंगळे यांनी पोलिसांत अर्ज केला होता. मात्र पिंगळे यांच्यावर आधी तीन गुन्हे दाखल झाल्याचे समजताच त्यांच्यावर मोठा मानसिक तणाव आला होता.

पोलीसांच्या चुकीमुळे माझ्या पतीने हे पाऊल उचलले आहे. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत बॉडी ताब्यात घेणार नाही.
-श्यामल सुरेश पिंगळे

पिंगळे यांनी पोलिस आयुक्तालयामध्ये जाऊन स्वत:ची नस कापून घेत स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. पोलिस आयुक्तालयाच्या गेटवर असलेल्या पोलिस कर्मचा-यांनी तातडीने धाव घेत त्यांच्यावर चादर, पोत्याच्या साहाय्याने आग विझविली, त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले.

बुधवारी त्यांना ससून रुग्णालयातून सायंकाळी सूर्य सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र ९५ टक्के भाजल्याने गुरवारी सायंकाळी ६.२० च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली असल्याचे त्यांचे मेहुणे विजय बोडेकर यांनी सांगितले.

हे ही वाचलं का?

Back to top button