डिव्हायडरला दुचाकी धडकून एकाचा मृत्यू | पुढारी

डिव्हायडरला दुचाकी धडकून एकाचा मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा: दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात पाठीमागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच कोरेगाव पार्क परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहूल महेंद्र अगरवाल (26, रा. बालेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हर्ष देशमुख असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
अगरवाल आणि देशमुख एका दुचाकीवरून जात होते.

यावेळी देशमुख गाडी चालवत होता. ते नॉर्थ मेन रस्त्यावर आले असता देशमुखचा ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडरला धडकली. यात गंभीर जखमी झालेल्या अगरवालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर देशमुख जखमी झाला आहे. अगरवाल मूळचा भुसावळ येथील रहिवासी असून, त्याच्या आत्याला भेटण्यासाठी बालेवाडीला आला होता. या प्रकरणी चालक देशमुखवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button