पाटस : ज्येष्ठ नागरिकाला 60 हजारांना लुटले | पुढारी

पाटस : ज्येष्ठ नागरिकाला 60 हजारांना लुटले

पाटस : येथील महाराष्ट्र बँकेत एका ज्येष्ठ नागरिकाकडील 60 हजार रुपये लुटून दोन चोरट्यांनी पोबारा केला. चोरी करणार्‍या दोन संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याची माहिती पाटस पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 28) रोजी सकाळी 11च्या सुमारास दिलीप शिवाजी खराडे (वय 65) यांनी पाटस येथील महाराष्ट्र बँकेतून 60 हजार रुपये काढून कॅरीबॅगमध्ये ठेवले.

या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील कॅरीबॅग कापून 60 हजार रुपयांची रोख रक्कम पळविली. या घटनेची फिर्याद दिलीप खराडे यांनी यवत पोलिसात दिली आहे. त्यानुसार यवत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार देवकाते करीत आहेत.

Back to top button