वडगावात विकासकामांचा शुभारंभ | पुढारी

वडगावात विकासकामांचा शुभारंभ

 

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग 2 व प्रभाग 17 मध्ये एकूण 1 कोटी 18 लाख रुपये निधीतून करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचा शुभारंभ नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार सुनील शेळके यांच्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान फंडातून व नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 17 मध्ये सुमारे 56 लाख 34 हजार रुपये खर्चातून करण्यात येणारे तीन रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच केशवनगर भागातील प्रभाग 2 मध्ये सुमारे 49 लक्ष रुपये खर्चातून रस्ता रुंदीकरण व अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटर अशी एकूण 1 कोटी 18 लक्ष रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

या वेळी माजी उपसभापती गणेश ढोरे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, संत तुकाराम साखर कारखाना संचालक सुभाषराव जाधव, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, मंगेश ढोरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. नगराध्यक्ष ढोरे यांनी या वेळी प्रभागातील विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात करत असताना रस्त्याची कामे उच्च दर्जाची करावीत, अशा सूचना संबधित ठेकेदाराला दिल्या. तसेच, काळात या दोन्ही परिसरात अजून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले.

Back to top button