लोणावळा, तळेगावच्या प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर | पुढारी

लोणावळा, तळेगावच्या प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर

लोणावळा : येथील नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी चार तर अनुसूचित जमातीसाठी एका जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांनी आता आपापले प्रभाग निश्चित करण्याकडे मोर्चा वळवला आहे.

सोमवारी सकाळी 11 वाजता उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील 13 पैकी 5 प्रभागांसाठी चिठ्ठी काढून आरक्षण काढण्यात आले. यात वलवण प्रभाग क्रमांक 3 व लोणावळा बाजारपेठ प्रभाग क्रमांक 8 हे प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तर, रेल्वे विभाग प्रभाग क्रमांक 4 व लोणावळा गावठाण प्रभाग क्रमांक 9 हे सर्वसाधारण अनुसूचित जातीकरिता राखीव झाले आहेत. याशिवाय खंडाळा प्रभाग क्रमांक 11 हा प्रभाग अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित झाला आहे. याशिवाय उर्वरित 8 प्रभागांसाठी प्रत्येकी एक जागा सर्वसाधारण महिला तर एक जागा सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाली आहे

Back to top button