पारगाव : भुईमूगाच्या पिकाला पावसाचा फायदा | पुढारी

पारगाव : भुईमूगाच्या पिकाला पावसाचा फायदा

पारगाव : सलग तीन-चार वेळा पडलेल्या पावसाचा फायदा उन्हाळी भुईमूग पिकाला झाला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अनेक शेतांमध्ये भुईमूग पिकात पाणी साचले आहे. भुईमूग पीक अंतिम टप्प्यात असताना पाऊस पडल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी भुईमुगाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात.

यंदा भुईमूग पिकाला शेवटपर्यंत मुबलक प्रमाणात पाणी मिळाले. पाण्याचा तुटवडा भासला नाही. जर भुईमूग पिकाला अंतिम टप्प्यात पाऊस पडला तर जमिनीतील शेंगा फुगवणीसाठी पाण्याचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे भुईमूग उत्पादक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. थोरांदळे, रांजणी, वळती, नागापूर आदी परिसरात सलग तीन-चार दिवस मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी भुईमूग पिकामध्ये पावसाचे पाणी साचले. त्याचा उपयोग जमिनीतील शेंगांना होणार असल्याने भुईमूग उत्पादक शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

Back to top button