सेनेचा आजपासून जनजागृती रथ | पुढारी

सेनेचा आजपासून जनजागृती रथ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: 
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील पाच वर्षांपासून भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. असा आरोप शिवसेनेने केला असून शहर शिवसेनेच्या वतीने भाजपाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी एक चित्रफीत बनवण्यात आली आहे. ही चित्रफीत आजपासून ते शनिवार दि.25 जूनपर्यंत शहरभर जनजागृती रथावर दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत शहरातील चौकाचौकात प्रसारित करण्यात येणार आहे.

बेळगाव-गोवा महामार्गावर कार पलटी; महाराष्‍ट्रातील चाैघे जखमी

या अभियानाचा समारोप रविवार दि. 26 जून रोजी सभेने करण्यात येणार आहे. शिवसेना शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी राज्य संघटक गोविंद घोळवे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, वैशाली मराठे, अनंत कोर्‍हाळे उपस्थित होते. चिखली येथे उभारण्यात येणार्‍या संतपीठामध्ये घोटाळा, नदी सुधार योजनेतील भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी योजनेतील हजारो कोटींचा घोटाळा असे विविध घोटाळे चित्रफितीद्वारे मांडणार आहे.

नाशिक : चालत्या रिक्षावर झाड कोसळून रिक्षाचालक व प्रवासी महिला ठार

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. मात्र, महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला 50 जागा याव्यात, अशी आग्रही भूमिका शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी या पत्रकार परिषदेत मांडली.

Back to top button