मुंबई; पुढारी ऑनलाईन: 'कोण होणार करोडपती' शो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या शोत अनेक नामांकित दिग्गजांनी हजेरी लावत जिंकलेल्या रक्कमेतून सामाजिक कार्याला हातभार लावला आहे. 'कोण होणार करोडपती' या मंचावर कराडच्या फार्मासिस्ट स्वाती शिंदे यांची एन्ट्री होणार आहे. या शोचे संचालन सचिन खेडेकर करत आहेत.
माणूस कोणत्याही मोठ्या आर्थिक संकटात सापडला तरी त्याचे ज्ञानच त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करते. ज्ञान कधीही उपयोगी पडू शकतं आणि हिच तुमची खरी ताकद आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीने स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात.
या आठवड्यात स्वाती शिंदे हॉट सीटवर खेळायला येणार आहेत. स्वाती या फार्मासिस्ट असून त्यांचे स्वतःचं औषधांचे दुकान आहे.
फार्मासिस्ट स्वाती शिंदे यांनी कोव्हिड-१९ परिस्थितीत आपलं कार्य कशा प्रकारे सुरू ठेवलं होतं हे सांगितले आहे. सचिन खेडेकर हे उत्तम संचालक असून हॉट सीटवर असलेल्या सर्व स्पर्धकांना सांभाळून घेतात. याशिवाय स्पर्धकांना या कार्यक्रमात बोलतंही करतात.
या कार्यक्रमातील 'कर्मवीर विशेष' पहिल्याच भागात पद्मश्री आणि अभिनेते नाना पाटेकर यांनी हजेरी लावली होती. या सामना ही खूपच मनोरंजक झाला होता.
आपल्या ज्ञानाच्या जोरावर येथेपर्यंत पोचलेल्या स्वाती शिंदे किती रक्कम जिंकू शकतील?, हे पाहण्यासाठी पाहा, 'कोण होणार करोडपती', सोम.-शनि. रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
हेही वाचलंत का?