भारताची गोल्फर आदिती अशोकचं पदक थोडक्यात हुकलं! | पुढारी

भारताची गोल्फर आदिती अशोकचं पदक थोडक्यात हुकलं!

टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची गोल्फर आदिती अशोक हिचे पदक थोडक्यात हुकले आहे. तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आदिती ऑलिम्पिकच्या गोल्फमध्ये चौथ्या स्थानी पोहोचलेली पहिली भारतीय महिला गोल्फर आहे.

आदितीचे चौथ्या फेरीत दोन स्ट्रोक्स चुकले. ऑलिम्पिकच्या पदकाजवळ पोहोचलेल्या आदितीने आज शनिवारी सकाळी दुसऱ्या नंबर वरुन सुरुवात केली. मात्र, त्यानंतर ती मागे पडली.

चौथ्या राऊंडच्या सुरुवातीला आदितीने चांगली कामगिरी करत पहिल्या स्थानापर्यंत मजल मारली. पण त्यानंतर तिचे काही स्ट्रोक्स चुकले. खराब हवामानामुळे काही वेळ खेळात व्यत्यय आला होता.

रियो ऑलिम्पिकमध्ये तिला ४१ वे स्थान मिळाले होते. तर टोकियो ऑलिम्पकमध्ये तिने चांगली कामगिरी केली आहे. पण तिचे पदक हुकले आहे.

जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर असलेली गोल्फर नैली कोरडा हिने सुवर्णपदक जिंकले आहे.

आदितीच्या खेळाचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कौतुक केले आहे. ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानापर्यंत पोहोचलेली आदिती पहिली भारतीय महिला गोल्फफटू आहे. तिने इतिहास रचला आहे, असे अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

आदिती अशोक हिचा जन्म १९९८ मध्ये बंगळूरमध्ये झाला. तिला लहानपासानूच गोल्फ खेळण्याची आवड होती.

आदिती ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी भारताची पहिली महिला गोल्फर आहे. तिने याआधी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.  यात २०१३ मधील एशियन यूथ गेम्स, २०१४ मधील यूथ ऑलिम्पिक गेम्स आणि २०१४ मधील एशियन गेम्सचा समावेश आहे.

हे ही वाचा :

 

 

Back to top button