पुणे : पीएमपीत युनिव्हर्सल पास तपासणी नावालाच | पुढारी

पुणे : पीएमपीत युनिव्हर्सल पास तपासणी नावालाच

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीएमपी बसमध्ये नुकताच युनिव्हर्सल पास बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांकडे हा पास आहे का? किंवा त्यांच्याकडे कोरोनाच्या दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र आहे का? याची तपासणीच होत नसल्याचे गुरुवारी केलेल्या पहाणीदरम्यान समोर आले. यावरून आता पीएमपीत युनिव्हर्सल पासची सक्ती फक्त नावालाच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुणे परिसरात चंदनचोर वाढले; गजाआड मात्र निम्मेच

पीएमपी बसमध्ये सध्या प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. परिणामी शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या संदर्भात अनेकदा वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पीएमपी प्रशासनाने बसमध्ये युनिव्हर्सल पास बंधनकारक केला आहे. मात्र, त्याची तपासणी वाहकांकडून व्यवस्थित होत नसल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर दै.‘पुढारी’च्या वतीने गुरुवारी शहरातील काही स्थानकांवर पाहणी करण्यात आली. यावेळी वाहकांकडून युनिव्हर्सल पास किंवा प्रवाशांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याच्या प्रमाणपत्राची तपासणी होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शहरात वाढत चाललेली कोरोनाची रुग्णसंख्या आता कशी थांबणार, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

पुणे : पुणे- दौंड डेमू रेल्वे रुळावरुन घसरली

पास तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा हवी

स्वारगेट परिसरात येणार्‍या बसला अगोदरच प्रचंड गर्दी असते. त्यातच येथील थांब्यावर असलेले प्रवाशांच्या गर्दीचे लोट बसमध्ये शिरतात. त्यामुळे एका वाहकाला तिकीट देण्यासोबतच प्रवाशांकडे युनिव्हर्सल पास आहे की नाही याची तपासणी करणे अवघड आहे. त्यामुळे बसमध्ये पास तपासणीसाठी पीएमपीने नवीन मनुष्यबळासह शहरात ठिकठिकाणी अशी यंत्रणा उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पुणे : रस्त्याच्या भूमीपूजनावरून राष्ट्रवादी आणि भाजप नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी

‘‘बसमध्ये युनिव्हर्सल पास तपासण्याच्या सूचना चालक-वाहकांना देण्यात आल्या आहेत. बसमध्ये वाहकांकडून युनिव्हर्सल पास तपासणी करण्यात येत आहे. जर वाहक करत नसतील, तर त्यांना पुन्हा एकदा कडक सूचना देण्यात येतील. अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.’’

– दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

हेही वाचा

पुणे : स्‍वर्णवचा अपहरणकर्ता अद्याप फरारच; श्वान पथकाचीही मदत, विविध ठिकाणी पोलिसांचे छापे

पुर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर पाठलाग करून गोळीबार

Pune Crime : दोन मित्र आपापसात भिडले; एकाने हत्‍यार चालवले, दुसऱ्याकडून फायरिंग, एकाचा जागीच मृत्‍यू

Why I Killed Gandhi : अमोल कोल्हेंच्या नथूराम गोडसे भूमिकेला राष्ट्रवादीचं समर्थन

Back to top button