पुणे : पुणे- दौंड डेमू रेल्वे रुळावरुन घसरली | पुढारी

पुणे : पुणे- दौंड डेमू रेल्वे रुळावरुन घसरली

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

साईड लाईनवर असलेली पुणे दौंड डेमू रेल्वे मुख्य मार्गावर घेताना आज (शुक्रवार) अकरा वाजण्याच्या सुमारास तिचा चौथा डब्बा घसरला, त्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट केले.

पुणे रेल्वे स्थानकावरून दिवसभरात संपूर्ण देशभरात रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांची वाहतूक होत असते. मात्र, रेल्वेचे डबे घसरल्याची ही घटना पुणे रेल्वे स्टेशनवर पहिल्यांदाच घडली आहे. त्यामुळे येथील प्रशासकीय कामकाजाबाबत मोठी शंका उपस्थित होत आहे.
साइडलाइनवरून मुख्य मार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी दौंड डेमू घेण्यात येत होती. यावेळी अचानकच या रेल्वेचा चौथा डब्बा घसरला. मात्र, हे डबे रिकामे असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे प्रशासनाकडून हे घसरलेले डबे पुन्हा ट्रॅक्टवर घेण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

साईडलाईनवरून मुख्य मार्गावर घेताना दौंड डेमू रेल्वेचा चौथा डब्बा घसरला. डबा घसरल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डब्बा पुन्हा ट्रॅक्टर घेण्यासाठी काम सुरू आहे. या अपघाताचा इतर कोणत्याही रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.
– मनोज झवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे पुणे विभाग

Back to top button