जळगाव : दुचाकींची समोरासमोर धडक, दोन जण ठार

जळगाव : दुचाकींची समोरासमोर धडक, दोन जण ठार
Published on
Updated on

जळगाव; पुढारी वृत्‍तसेवा :  जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी– गोदेगाव दरम्यान दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात दोनजण ठार तर एक जखमी झाला. ही घटना (रविवारी) सायंकाळी घडली.

दीपक गायकवाड हा मित्र कृष्णा सोनवणे यांच्यासोबत दुचाकीने रविवारी त्याची जामनेर तालुक्यातील जोगलखेडा येथील बहीण राधाबाई हिच्या भेटीसाठी गेला होता.

तेथून परतत येत असताना शेंदुर्णी गावाजवळ समोरून भरधाव येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्‍याच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात दीपक याचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा हा जखमी झाला, तर धडक देणाऱ्या दुचाकीवरील दिनेश मदन जाधव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

या दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आले आहेत.

यात दीपक रामदास गायकवाड (वय २५, रा. डकला, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) व दिनेश मदन जाधव (वय २३, रा. गोंदेगाव तांडा, ता. सोयगाव) अशी मृतांची नावे आहेत.

या अपघातात कृष्णा उत्तम सोनवणे, (रा. डकला, ता. सिल्लोड) हा जखमी झाला आहे.

त्याला पुढील उपचारांसाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news