शर्लिन चोप्रा म्हणते ‘मला पोर्नोग्राफीच्या रॅकेटचा पर्दाफाश करायचाय!’ | पुढारी

शर्लिन चोप्रा म्हणते ‘मला पोर्नोग्राफीच्या रॅकेटचा पर्दाफाश करायचाय!’

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज कुंद्राशी संबंधित पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्राची शुक्रवारी मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने चौकशी केली. सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर शर्लिनने चौकशीचे ठिकाण सोडले. या चौकशीदरम्यान तिने अनेक तपशील उघड केले.

शर्लिनंने चौकशीबाबतची माहिती देताना सांगितले की, मला २०१९ पासून आर्म्सप्राइम आणि माझ्यातील कराराबद्दल विचारण्यात आले. त्याआधी मी राज कुंद्राला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटले होते आणि त्या बैठकीत त्याच्याशी झालेल्या माझ्या संवादाबद्दल, तसेच आमच्या कराराबद्दलची माहिती पोलिसांना दिली. तसेच आमच्या करारानंतर किती व्हिडिओ बनवले गेले याबद्दलही सांगितले.

शर्लिन चोप्रा
शर्लिन चोप्रा

ती म्हणाली की, मला आमच्या व्हिडिओंच्या शूटिंग दरम्यान कोण उपस्थित होते आणि कंटेंट निर्मितीमध्ये गुंतलेल्या लोकांबद्दल देखील विचारले गेले. मला राज कुंद्राच्या कंपनी हॉटशॉट्स, बॉली फेम आणि इतरांबद्दल आणि राज कुंद्रासोबतच्या माझ्या नातेसंबंधाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आले. राजने माझ्या घरी कधी भेट दिली आणि त्याच्या भेटीचे कारण काय होते? याचीही माहिती शर्लिनने पोलिसांना सांगितली.

शलिनने अश्लीलतेच्या विरोधात बोलल्याबद्दल तिला ट्रोल करण्यात आले. तिने याबद्दल नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली की, प्रत्येक वेळी जेव्हा मी अश्लीलतेबद्दल बोलते तेव्हा मला ट्रोल केले जाते. मी २०१२ मध्ये प्लेबॉयसाठी शूट केले होते. हे खरे आहे की आधी मला बोल्ड आशयाच्या शूटिंगमध्ये समस्या नव्हती, परंतु जेव्हा आपण कायदे मोडतो तेव्हा आपण आपल्या कृतींवर प्रश्नचिन्ह उभे केले पाहिजे.

शर्लिन चोप्रा
शर्लिन चोप्रा

कोणताही अधिकार बेकायदेशीर पोर्नोग्राफी सहन करणार नाही. म्हणून मला फक्त त्या ट्रोल्सना सांगायचे आहे जे म्हणतात की, पोर्नोग्राफीमध्ये काय चूक आहे, आपण सगळे ते बघतो, हे विसरू नका, सर्व पॉर्न वेबसाइटवर सरकारने बंदी घातली आहे. हा कायदा आहे आणि आपण तो मोडू नये, तेही इतक्या मोठ्या स्तरावर.

शर्लिन म्हणते की, राज कुंद्रा तरुणींची दिशाभूल करत होता. मला वाटते की त्या सर्व मुली ज्यांची दिशाभूल केली गेली आहे, त्यांना भारतातील पोर्नोग्राफीशी संबंधित नियम आणि त्यानंतरच्या शिक्षेबद्दल माहिती नसेल. कामाच्या शोधात या क्षेत्रात येणा-या तरुणी विचार करतात की जर राज कुंद्रा “ठीक आहे” असं म्हणत असेल तर त्या राज कुंद्राच्या बोलण्याला सत्य मानतात. आणि इथेच दिशाभूल सुरू होते. मला फक्त पीडित तरुणींना विनंती करायची आहे की त्यांनी पुढे यावे आणि त्या या क्षेत्रात कशा आल्या आणि कशा आकर्षित झाल्या हे उघड करावं.

शर्लिन चोप्राने आर्मप्राईमशी केलेल्या कराराचा तपशील पोलिसांना शेअर केला आहे. तिने हे देखील स्पष्ट केले की हे प्रकरण कोणत्याही प्रकारे सूडबुद्धीचा खेळ नाही, परंतु पोर्नोग्राफीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न आहे.

मी तुमच्या मीडियाच्यामाध्यमातून विनंती करू इच्छिते की जर कुणाला या रॅकेटशी संबंधित काही माहिती असेल, तर कृपया पुढे या आणि पोलिसांसोबत माहिती शेअर करा, असंही आवाहन शर्लिननं केले आहे.

Back to top button