नाशिक महापालिका : क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता प्रभाग सर्वात मोठा, कोणता लहान?

नाशिक महापालिका : क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता प्रभाग सर्वात मोठा, कोणता लहान?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेच्या अनुषंगाने नाशिक महापालिका क्षेत्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक 3 हा सर्वांत मोठा प्रभाग ठरला असून, सिडको विभागातील प्रभाग क्रमांक 37 हा सर्वांत लहान प्रभाग ठरला आहे.

सर्वाधिक मोठा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये म्हसरूळ गावठाण व मळे परिसर, वैदुवाडी, गजपंथ सोसायटी परिसर, आडगाव गावठाण व मळे परिसर, मेडिकल कॉलेज, एमईटी कॉलेज, कोणार्कनगर, जत्रा हॉटेल परिसर, निशांत व्हिलेज, सागर व्हिलेज परिसर, शरयू पार्क, ग्रामीण पोलिस वसाहत आदी परिसराचा समावेश आहे.या प्रभागात उत्तरेकडे दिंडोरी रोड मनपा हद्दीवरील म्हसरूळ स. नं. 34 पासून पूर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 पर्यंत व तेथून मनपा हद्दीने आडगाव गट क्र. 1794 चा भाग समाविष्ट आहे.

पूर्वेकडे आडगाव गट नंबर 1794, दक्षिणेकडे औरंगाबाद रोड स. नं. 2283 पर्यंत, दक्षिणेकडे औरंगाबाद रस्त्यावरील आडगाव स. नं. 2283 पासून औरंगाबाद रस्त्याने पश्चिमेकडे जाऊन उत्तरेकडील आडगाव गट नं. 277 पर्यंत तेथून पुढे नांदूर जत्रा रस्त्यापर्यंत, तेथून उत्तरेकडील 18 मीटर डी. पी. रस्त्यापर्यंत, तेथून पुढे मुंबई-आग्रा महामार्गाने रासबिहारी रस्त्यापर्यंत, पुढे औदुंबर लॉन्स, वाघाडी नदीने 18 मीटर डीपी रोडपर्यंत, तेथून राज पॅलेस, दिंडोरी रोडपर्यंत. दिंडोरी रोडवरील आकाश पेट्रोलपंपासमोरील राज पॅलेसपासून दिंडोरी रस्त्याने म्हसरूळ स. नं. 34 पर्यंतचा परिसर प्रभागात समाविष्ट आहे.

असा आहे सर्वांत लहान प्रभाग
सर्वांत कमी क्षेत्रफळ असलेल्या सिडकोतील प्रभाग 37 मध्ये पवननगर, शिवनेरी गार्डन, पवननगर स्टेडियम, भाजी मार्केट, जनता विद्यालय, राजरत्ननगर गार्डन या परिसरांचा समावेश आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news