

वास्को : पुढारी वृत्तसेवा
गोव्याच्या निवडणुकीत मतदारांकडे दोनच पर्याय आहेत. पहिला म्हणजे आपला मत देऊन प्रामाणिक सरकार बनविणे किंवा मग भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देऊन त्यांना सरकार बनवू देणे, असे विधान आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. मंगळवारी त्यांनी दाबोळी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
चार दिवसांच्या दौर्यावर असलेले अरविंद केजरीवाल यांचे मंगळवारी दुपारी गोव्यात आगमन झाले. ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक गोव्यासाठी महत्त्वाची आहे. गोवेकरांनी ठरवावे की, त्यांच्यासाठी काय चांगले आहे. त्यांच्याकडे भ्रष्टाचारमुक्त सरकारचे आश्वासन देणार्या 'आप'ला पाठिंबा देणे हा एक पर्याय आहे.
दुसरा पर्याय म्हणजे, भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणे काँग्रेस आमदारांच्या पक्षांतराबाबत ते म्हणाले की, गेल्या निवडणुकीत भाजप सरकारला कंटाळलेल्या गोवेकरांनी काँग्रेसची निवड केली. मात्र, काँग्रेसच्या आमदारांनी गोवेकरांना फसवले. यावेळीही परिस्थिती तशीच आहे, राज्याच्या प्रत्येक भागात काँग्रेस पक्षांतराची चर्चा आहे. भाजपने नवी रणनीती आखली आहे. काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार आहेत.
भाजपची 'त्यांना' आर्थिक मदत
सासष्टीचा बालेकिल्ला जिंकल्याशिवाय सरकार स्थापन करू शकत नाही हे भाजपला कळाल्याने, त्यांनी काँग्रेसच्या बॅनरखाली सात उमेदवारांना निवडणुकीत उभे केले आहे. ते त्यांना आर्थिक मदत करत आहेत, असा आरोपही केजरीवाल यांनी यावेळी केला.
हेही वाचलतं का ?