गिरणा धरणातून सोडलेल्या पांझण डाव्या कालव्यातील पाण्याने शेतकरी सुखावला : आमदार सुहास कांदे | पुढारी

गिरणा धरणातून सोडलेल्या पांझण डाव्या कालव्यातील पाण्याने शेतकरी सुखावला : आमदार सुहास कांदे

नांदगाव; पुढारी वृत्तसेवा : आज (दि. २६) सकाळी  गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. यावेळी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी पाण्याचे विधीवत पुजन केले. यावेळी मालेगावमधील कळवाडीसह परिसरातील गावांच्या पाणीटंचाईसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याची  प्रतिक्रिया आमदार कांदे यांनी दिली.

गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आंनद साजरा केला. यावेळी आमदार कांदे यांनी या पाटाला आलेल्या पाण्याचे विधिवत पूजन केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळवाडीसह सर्व ग्रामीण भागातील जनतेकडून आमदार कांदे यांचा नागरिक सत्कार देखील यावेळी करण्यात आला.

मालेगाव तालुक्यातील कळवाडीसह परिसरातील गावांना गिरणा धरणातून दरवर्षी पांझण डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येते. मात्र यंदा सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे धरणात पाणीसाठा कमी आहे. यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले होते. आमदार सुहास कांदे यांनी याबाबत गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. यानुसार २९ नोव्हेंबर रोजी जलसंपदा विभागाने तापी पाटबंधारे विकास महामंडळाला पत्र देत गिरणा धरणातून पांझण डावा कालव्याद्वारे आवर्तन सोडण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.

यावेळी आमदार सुहास कांदे यांनी बोलताना जलसिंचनावर प्रामुख्याने विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, लवकरच या परिसरातील गावातील शेतकऱ्यांची एक कमिटी करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या सर्व गावाकरिता पाणी आरक्षित करण्यात येईल. तसेच उर्वरित गिगाव दहिवाळ रोझे पाडळदे शेरूळ हिसवाळ या गावांना लिफ्टद्वारे पाणी मिळवून देणार अश्वासन कांदे यांनी दिले.

याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, ज्ञानेश्वर भाऊ कांदे, गटप्रमुख दिनकर आबा महाले, यशवंत देसले, प्रदीप सर देसले, रोहित जाधव, बाळू शेठ बोरा, सोनू पाटील, महेंद्र सिसोदे, उदयसिंग मांडवडे, विजय इप्पर, चंद्रशेखर शेलार, केदा भवर, नाना पगार, प्रवीण जिंजर, अजित सूर्यवंशी, प्रवीण सावकार, बाबाजी सूर्यवंशी, यशवंत भीमराव देसले, जगदीश देसले, अनिल देसले, गंभीर देसले, हेमंत देसले, प्रदीप देसले, राकेश आहिरे, साहेबराव नरवडे, अभिमान डांबरे, पीडी चव्हाण, राजू आहिरे, राहुल सरावत, महेंद्र परदेशी, किशोर बोराळे, विलास परदेशी, महेश शेरेकर, सुरेश अहिरे, मिनराम शांताराम मगर, दिलीप मगर, आण्णा मगर आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button