नाशिक जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित, ५ नोव्हेंबर रोजी मतदान | पुढारी

नाशिक जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित, ५ नोव्हेंबर रोजी मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच १४९ ग्रामपंचायतींमधील सरपंचाच्या पाच व सदस्यांच्या २०२ रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम मंगळवारी (दि. ३) घोषित झाला. या सर्व ठिकाणी ५ नोव्हेंबरला मतदान, तर ६ तारखेला मतमोजणी होणार आहे.

संबधित बातम्या :

राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी ते डिसेंबर २०२३ या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापन झालेल्या, सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचनेमुळे निवडणुका होऊ न शकलेल्या तसेच रिक्त जागांसाठीच्या पाेटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. तसेच २०६८ ग्रामपंचायतींमधील २९५० सदस्य व १३० सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका पार पडतील. दरम्यान, नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील 48, धुळ्याच्या 31, जळगावमधील 168, नगरच्या 194 आणि नंदुरबारमधील 16 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचा टप्पा पार पडणार आहे.

आयोगाने कार्यक्रमानुसार तहसीलदार कार्यालयाकडून शुक्रवारी (दि.६) निवडणुकांची अधिसूचना घाेषित केली जाईल. उमेदवारांना 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशन दाखल करण्यासाठी मुदत असेल. तर 23 ला छाननी व 25 ऑक्टोबरला दुपारी तीनपर्यंत माघारीची मुदत असेल. माघारीनंतर रिंगणामधील अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हवाटप केले जाईल. तसेच दिनांक 5 नोव्हेंबर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान घेण्यात येईल. 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. निवडणुका जाहीर झाल्याने संबंधित गावांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे. इच्छुकांसह त्यांचे समर्थक कामाला लागले आहेत.

हेही वाचा :

Back to top button