Gold-Silver Rates : सोने चांदीची चकाकी पितृपक्षात झाली फिकी, दरात कमालिची घसरण

Gold-Silver Rates : सोने चांदीची चकाकी पितृपक्षात झाली फिकी, दरात कमालिची घसरण
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, पितृपक्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीची चकाकी फिकी पडल्याचे दिसून येत आहे. सोने-चांदीच्या दरात कमालिची घसरण झाली असून, मागणी घटल्याने भाव घसरले आहेत. वास्तविक गत सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या सत्रातच सोने-चांदीचे दर दणकावून आपटले होते. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सत्रात हा सिलसिला कायम राहिल्याने, दर कमालीचे कमी झाले आहेत. अशात गुंतवणूकदारांना सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. (Gold-Silver Rates)

भारतीय परंपरेनुसार पितृ पक्षात सोने-चांदीची खरेदी केली जात नाही. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात मागणीवर परिणाम होत असल्याने दर कमी झाले आहेत. १५ ते १९ सप्टेंबरपर्यंत या दोन्ही धातूंमध्ये तेजीचे सत्र बघावयास मिळाले. अखेरच्या आठवठ्यात मात्र, दोन्ही धातूंमध्ये घसरण सुरू झाली. २८ सप्टेंबर रोजी सोने ६५० रुपयांनी स्वस्त झाले. पुढे २९ सप्टेंबर रोजी अडीचशे रुपयांची भर पडली. ३० सप्टेंबर रोजी तीनशे रुपयांनी सोने स्वस्त झाले. तर १ आणि ऑक्टोबरला सोने १५० रुपयांनी घसरले. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, सोने-चांदीत दिवाळीपर्यंत आणखी घसरणीचा अंदाज आहे. दोन्ही धातूंचा डॉलरसमोर निभाव लागणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. अशात पुढील काळात सणासुदीचे दिवस बघता, ग्राहकांना स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी आहे. (Gold-Silver Rates)

दरम्यान, सोने-चांदीच्या दरात होत असलेल्या घसरणींमुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. १५ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत असून, त्यानंतर येणाऱ्या दसऱ्याच्या मुहूर्तापर्यंत घसरण सुरू राहिल्यास, मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून सोने-चांदीची जोरदार खरेदी केली जाण्याची शक्यता आहे.

चांदी ७१ हजारांवर

सोने स्वस्त होत असतानाच चांदीचे भावही झपाट्याने घसरत आहेत. काही दिवसांपूर्वी चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला होता. जेव्हा सोन्याच्या दरात चढउतार बघावयास मिळत होता, तेव्हा चांदीचे दर स्थिर होते. अशात चांदीचे दर कमी होणार की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडला होता. दरम्यान, आता चांदीच्या दरातही घसरण झाली असून, मंगळवारी (दि.३) प्रति किलो ७१ हजार इतका दर नोंदविला गेला आहे.

असे घसरले दर

तारिख – २२ कॅरेट – २४ कॅरेट

२५ सप्टेंबर – ५,४९८ – ५,९९८

२६ सप्टेंबर – ५,४७८ – ५,९७६

२७ सप्टेंबर – ५,४५३ – ५,९४८

२८ सप्टेंबर – ५,३९३ – ५,८८३

२९ सप्टेंबर – ५,३९२ – ५,८५६

३० सप्टेंबर – ५,३३८ – ५,८२३

१ ऑक्टोबर – ५,३३८ – ५,८२३

२ ऑक्टोबर – ५,३२३ – ५,८०७

३ ऑक्टोबर – ५,३२३ – ५,७४१

(सर्व दर प्रति ग्रॅमसाठी आहेत)

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news