कोल्हापुरात आज ‘पुढारी सहकार महापरिषद’ | पुढारी

कोल्हापुरात आज ‘पुढारी सहकार महापरिषद’

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सहकारी पतसंस्था आणि मल्टिस्टेट सोसायट्यांच्या प्रश्नांवर विचारमंथन करण्यासाठी दै. ‘पुढारी’च्या वतीने बुधवारी (दि. 4) कोल्हापुरात एकदिवसीय ‘पुढारी सहकार महापरिषद’चे आयोजन करण्यात आले आहे. या सहकार महापरिषदेचे उद्घाटन राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होईल. या परिषदेत पतसंस्था आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सहकार विभागाचे अधिकारी यांच्यात संयुक्त चर्चा होणार असून, सहकार चळवळीला नवी दिशा देणारे मार्गदर्शन होणार आहे.

कोल्हापूरमध्ये हॉटेल सयाजी येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही महापरिषद होणार आहे. उद्घाटनप्रसंगी ‘द महाराष्ट्र राज्य सहकारी बँके’चे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राज्याचे अपर निबंधक (सहकारी संस्था) शैलेश कोतमिरे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट महाराष्ट्रचे अध्यक्ष सुरेश वाबळे, दै. ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे कोल्हापूर विभागीय प्रमुख दिलीप ब. पाटील, गो-कॅशलेस इंडिया प्रा.लि.चे चेअरमन कृष्णात चन्ने, श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत भालेराव, सहकार विभागाचे माजी सहसंचालक डी. ए. चौगुले, बुलडाणा अर्बन को-ऑप सोसायटीचे प्रतिनिधी, कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

‘पुढारी सहकार महापरिषद’चे मुख्य प्रायोजक ‘द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’ आहे, तर ही महापरिषद पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आहे. गो-कॅशेलस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे डिजिटल पार्टनर आहे, तर सहयोगी प्रायोजक श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी आहे. समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगाव व फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट महाराष्ट्र राज्य, बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी हे सहप्रायोजक आहेत. या सहकार महापरिषदेत कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील पतसंस्था, मल्टिस्टेट सोसायटी, के्रडिट सोसायटी सहभागी होणार आहेत.

या महापरिषदेत पतसंस्था आणि मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्यासमोरील आव्हाने, त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी नव्या पर्यायांचा शोध, व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्राचा वापर करून कारभारात सुसूत्रता, ऑडिट आणि सहकार कायदा या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. पतसंस्था आणि इतर संस्था प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सन्माचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क अतुल : 8805007237.

Back to top button