कोणी 1 महिना, तर कोणी 9 महिने ससूनमध्ये तळ ठोकून! ’त्या’ नऊ कैद्यांचा ससूनमध्ये पाहुणचार
पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोणी एक महिना… कोणी चार महिने… तर कोणी नऊ महिने ससून रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमध्ये उपचारांच्या नावाखाली तळ ठोकून असल्याचे दै. ‘पुढारी’च्या पाहणीत आढळून आले आहे. आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावरून येरवडा कारागृहामध्ये न्यायालयीन बंदी असलेल्या अनिल भोसलेपासून गँगस्टर रूपेश मारणे याच्यासह अनेक ‘रथी-महारथीं’चा ससूनच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये मुक्काम आहे.
येरवडा कारागृहात संशयित
आरोपींचा मुक्काम असतो. आरोपींकडून ‘साम-दाम-दंड-भेद’चा वापर करून वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली ससून रुग्णालयात मुक्काम हलविला जातो. एकीकडे गंभीर आजारांचे कैदी असतानाही काही मर्जीतील आरोपींनाच ससूनची सफर घडवून आणली जाते. त्यासाठी कारागृहातील डॉक्टर, आरोपी पार्टी पोलिस आणि ससूनमधील डॉक्टर, कर्मचार्यांचे हात ओले केले जातात.गंभीर आजाराच्या कैद्यांना केवळ ओपीडीचे दर्शन घडवून त्यांचे समाधान केले जाते, तर ठरावीक माननीयांची खास बडदास्त ठेवली जाते. ससून रुग्णालयामध्ये कैदी आजारांचा बनाव करून दाखल होतात. त्यानंतर आजार छोटा असला तरी पोलिस आणि डॉक्टरांच्या मदतीने उपचारांसाठी मुक्काम ठोकतात. अशा परिस्थितीत कारागृह, ससून प्रशासन काय भूमिका बजावते? असा संशय निर्माण झाला आहे.
नाव वय अॅडमिट दिवस आजार
अनिल शिवाजीराव भोसले 56 130 किडनीचा आजार
प्रवीण प्रल्हाद राऊत 38 34 मूळव्याध
हरिदास कोंडिबा साठे 72 12 अॅपेंडिक्स
आदित्य दादा मारणे 35 28 त्वचारोग
शिवाजी ज्ञानोबा दोरगे 50 29 हर्निया
विरल प्रकाश सावला 34 274 तीव्र उच्च रक्तदाब
विनय विवेक अर्हाना 50 19 अपचनाचा आजार
हेमंत बालाजी पाटील 41 60 पाठदुखी
रूपेश कृष्णराव मारणे 47 42 श्वसनाचा आजार
हेही वाचा
World Cup 2023 : कर्णधार रोहित शर्मा मिळवून देणार का विश्वविजेतेपद?