धुळे: आयशरखाली सापडून सोनगीरच्या महिला डॉक्टरचा मृत्यू | पुढारी

धुळे: आयशरखाली सापडून सोनगीरच्या महिला डॉक्टरचा मृत्यू

धुळे, पुढारी वृत्तसेवा : मुंबई – आग्रा महामार्गावर शिरपूरकडे जाणाऱ्या आयशरखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.८) घडली. या संदर्भात आयशर चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुक्यातील सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आदिती जोगळेकर- सोनवणे (वय 35 ) या दंतवैदक म्हणून कार्यरत होत्या. आज त्या दुचाकीवरून (एमएच १८ बी व्ही 0751) धुळ्याकडून सोनगीरच्या दिशेने रुग्णालयात जात होत्या. यावेळी मागून येणाऱ्या भाजीपाला वाहतूक करणाऱ्या आयशरने (आरजे 11 जीबी 81 60) त्यांच्या दुचाकीला धडक देऊन आयशर उलटला.

आयशर खाली डॉक्टर जोगळेकर दबल्या गेल्या. हा अपघात झाल्याने वाहन चालक आणि नजीकच्या शेतकऱ्यांनी तातडीने त्यांना बाहेर काढून धुळे येथील रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळावर मोठी गर्दी झाली. दरम्यान, या प्रकरणात आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button