धुळे : दीर्घ विश्रांतीनंतर पिंपळनेरसह परिसरात पावसाची हजेरी | पुढारी

धुळे : दीर्घ विश्रांतीनंतर पिंपळनेरसह परिसरात पावसाची हजेरी

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

दिर्घ विश्रांतीनंतर पिंपळनेरसह परिसरात पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. पहाटेपासूनच वीजांच्या कडकडाटासह सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळण्याच्या आशेने शेतकरी राजा सुखावला आहे. सोबतच वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे.

दोन महिने पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पिके हातातून जाण्याच्या स्थितीत असतांना अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. जून महिन्यात पाऊस झाला त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिना कोरडा गेला. यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. खरीप पिके हातातून जाण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्याच दरम्यान आज बहुप्रतिक्षेनंतर पिंपळनेर शहरासह आदिवासी पश्चिम पट्ट्यात पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून पावसामुळे भात, नागली, मका, सोयाबीन, बाजरी पिकांना आधार मिळाला आहे.

महावितरणने पुन्हा साधली संधी
महावितरण कंपनीकडून आधीच भारनियमन सुरू आहे. त्यात आज वादळी वारा नसतांनाही पाऊस सुरू होताच बत्ती गुल झाली. रात्रभर विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे पिंपळनेरकरांची चांगलीच घालमेल झाली.

हेही वाचा :

Back to top button