

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा; साक्री तालुक्यातील धवळीविहीर येथे महानायक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बापू चौरे हे होते तर प्रमुख पाहुणे मोहन सूर्यवंशी होते.
बिरसा मुंडा यांचा पुतळा धवळीविहीर गावातील शिल्पकारांनी बनविला आहे. गावातील मूर्तिकार डोंगर सूर्यवंशी, दिलीप गांगुर्डे, राजू साबळे, सुनील अहिरे, बंडू अहिरे या मूर्तिकारांनी आपले कौशल्य वापरत अत्यंत कमी खर्चात महानायक बिरसा मुंडा यांचा पुतळा बनिवला आहे. तसेच गावातील बांधकाम मिस्तरी पुनाजी पवार, राजमल अहिरे, गुलाब अहिरे, महारु अहिरे, यांच्यासह तरुण मित्रांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमावेळी साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, प्रभाकर पवार, जगन गायकवाड, हसमुख चौरे, रोहिदास कोकणी मंगलदास अहिरे, मगन पवार, अरुण गावीत, रघुनाथ चौरे, पंकज सूर्यवंशी, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेश गावित, निलेश गावित, चौरे सर, दिलीप बागुल, सरपंच सिंधबन, राजेंद्र पवार, डॉ. चेतन पवार, सरपंच प्रभावतीताई अहिरे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य धवळी विहीर, गावातील आयोजक टीम व गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
हेही वाचलतं का?