New Mahindra cars : 2022 मध्ये महिंद्राकडून Scorpio, Thar यासह अनेक गाड्या जबरदस्त फिचर्ससह नव्या रुपात येणार | पुढारी

New Mahindra cars : 2022 मध्ये महिंद्राकडून Scorpio, Thar यासह अनेक गाड्या जबरदस्त फिचर्ससह नव्या रुपात येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील अग्रगण्य वाहन कंपनी महिंद्रा यंदा २०२२ ला नवीन वाहने सादर करण्याच्या प्रतिक्षेत आहे. महिंद्राकडून यंदा Scorpio, XUV700 six-seat variant, Mahindra Thar five-door, Mahindra eKUV100 and eXUV300 या मॉडेल्समध्ये वेगळे बदल करत बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. या वाहनांमध्ये ग्राहकांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठीचे फिचर्स बनवण्यात आल्याचे कंपनीच्या सुत्रांकडून माहिती मिळते आहे. (New Mahindra cars)

New Mahindra cars Scorpio

 New Mahindra cars

महिंद्रा new Scorpio लाँच करण्याच्या तयारीत आहे. मागच्या काही महिन्यांपासून महिंद्राकडून नव्या स्कॉर्पिओची देशातील विविध ठिकाणी चाचणी घेण्यात आली आहे. जुन्या Scorpio पेक्षा नवीन Scorpio अधिक उठावदार आहे.

नव्या स्कॉर्पिओमध्ये रिअर सीट्स या कॅप्टन सीट्स असणार आहेत. कंपनीने नव्या स्कॉर्पिओला एकदम SUV अंदाजात बाजारात आणणार आहे. त्यामुळे ग्राहकांमध्येही नव्या स्कॉर्पिओच्या नव्या मॉडेलबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

स्कॉर्पिओ-२०२२ मध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टमची सुविधा दिली जाणार आहे. या स्कॉर्पिओमध्ये 2.0-litre mStallion टर्बो पेट्रोल इंजिन असेल तर 2.2-litre mHawk हे डिजेल इंजिन असणार आहे. याशिवाय १० स्पीकरची ऑडिओ सिस्टम, ९ इंचाचा इन्फोन्टेनमेंट सिस्टम, LED हेडलाइट्स, ६ एअरबॅग्स आणि कनेक्टेड कार सिस्टमसारखे हायटेक फिचर्स दिले जाऊ शकतात.

New Mahindra cars Mahindra XUV700

New Mahindra cars

महिंद्रा यंदाच्या वर्षात SUV कारचा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. महिंद्राने XUV700 सहा-सीटर नुकतीच लॉन्च केली आहे. मोठ्या कुटुंबाला प्रवास करण्यासाठी या गाडीचे फिचर्स तयार करण्यात आले आहेत.

XUV700 पुर्वी ५ आणि ७ सीटमध्ये उपलब्ध आहे. सध्या ती सहा सीटमध्ये आणण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. ही गाडी 2.0-लिटर mStallion टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 2.2-litre mHawk डिझेल इंजिन अशा दोन प्रकारात असणार आहे. तसेच ही गाडी सहा-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची ही सुवीधा असल्याचे सांगण्यात येते.

mahindra thar

New Mahindra cars

महिंद्राकडून मागच्या कित्येक वर्षांपासून जीपचे नविन मॉडेल्स बनवण्यात येत आहेत. दरम्यान मागच्या काही काळात महिंद्राकडून थार बाजारात आणली आहे. यंदाच्या वर्षी महिंद्राकडून पाच दरवाजे असलेली कार बाजारात येणार आहे. या कारमध्ये अनेक वैशिष्ट्ये असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

२०२६ पर्यंत महिंद्राकडून थारचे ९ प्रकार बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये थारचे नवीन मॉडेल बाजारात आले होते त्याला तीन दरवाजे होते सध्या येणाऱ्या नवीन मॉडेलला ५ दरवाजे असल्याने विशेष आकर्षण असणार आहे.

तसेच या कारला फोर व्हिल ड्राइव्ह सिस्टम आणि मॅन्युअल-शिफ्ट ट्रान्सफर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही गाडी 2.0-लीटर, ४-सिलेंडर mStallion पेट्रोल इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे.

150bhp आणि 320Nm टॉर्क जनरेट करण्यासाठी याची मदत होणार आहे. तर 2.2-लीटर mHawk डिझेल इंजिन जे 130bhp आणि 320Nm टॉर्क निर्माण करते. इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल किंवा सहा-स्पीड स्वयंचलित पर्यायामध्ये असू शकतात.

eKUV100 आणि eXUV300

New Mahindra cars

महिंद्राने २०२० ऑटो एक्सपोमध्ये eKUV100 आणि eXUV300 या वाहनांना प्रदर्शनातून दाखवण्यात आले होते. 2020 मध्ये कोरोनामुळे आणि वाहनांच्या कमतरतेमुळे त्याच्या लॉन्च करण्यास विलंब लागला आहे.

हे दोन्ही मॉडेल्स इलेक्ट्रिकमध्ये येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जर सेमीकंडक्टरमधील पुरवठा पुढील काही महिन्यांत सुधारला तर यंदा ही वाहने इलेक्ट्रीकमध्ये येतील असे दिसते आहे.

eKUV100 चे output 54bhp आणि 120Nm पीक टॉर्क 147kms चा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. ही वाहने पेट्रोलसोबत इलेक्ट्रिक रेंजसह automatic transmission या प्रकारात असण्याची शक्यता आहे.

New Mahindra cars

eXUV300 ला eKUV100 पेक्षा चांगल्या ड्रायव्हिंग रेंजसह अधिक शक्तिशाली बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप या वाहनांचे फिचर्स अधिकृतपणे उघड केली नाहीत. तसेच पुढल्या काही काळात ही वाहने बाजारात असतील असा कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button