उत्तराखंडमध्ये भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये कडवी टक्कर, जाणून घ्या सर्व्हे काय सांगतोय? | पुढारी

उत्तराखंडमध्ये भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये कडवी टक्कर, जाणून घ्या सर्व्हे काय सांगतोय?

पुढारी ऑनलाईन: उत्तराखंड विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष पूर्ण मेहनत घेऊन निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. नुकत्याच झालेल्या चंदीगड महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आम आदमी पक्षाचा उत्साह वाढला आहे आणि ‘झाडू’ उत्तराखंड निवडणुकीतही आपला चमत्कार दाखवेल अशी आशा आहे. आता आपण जाणून घेऊया की, सर्वेक्षणानुसार उत्तराखंडमध्ये ‘आप’ला किती जागा मिळण्याची शक्यता आहे.

अमरावती : पतीच्या संमतीने पत्नीशी लगट साधण्याचा मित्राचा प्रयत्न, दाेघांवर गुन्‍हा

‘आप’ला किती जागा मिळणार?

टाईम्स नाऊ आणि नवभारतच्या सर्वेक्षणानुसार उत्तराखंडमध्ये भाजपचा विजय होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या 70 जागांपैकी भाजपला 42 ते 48 जागा मिळू शकतात. दुसरीकडे काँग्रेसला 12 ते 16 जागा मिळू शकतात. तर आम आदमी पक्षाला चार ते सात जागा मिळण्याची शक्यता आहे. जर या सर्वेक्षणाचा अंदाज बरोबर निघाला तरी, भाजपच्या विजयी उमेदवारांची संख्या पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत कमी होणार आहे. हा सर्व्हे काँग्रेसला आणखी पाच वर्ष विरोधात काढावी लागतील असं सांगतो. सध्या काँग्रेस भाजपकडून सत्ता हिसकावण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे.

OBC आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत ही सरकारची भूमिका : अजित पवार

भाजप, काँग्रेस आणि आप यांच्यात निकराची लढत

हा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. मात्र, देवभूमी उत्तराखंडमध्ये भाजप, आप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई आहे. निवडणुकीला आणखी काही अवधी शिल्लक आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती दर दिवसाला बदलत आहे. अशा स्थितीत निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काहीही असो, आम आदमी पक्ष हळूहळू दिल्लीतच नव्हे तर इतर राज्यांतही आपली पकड मजबूत करत आहे, यात शंका नाही. चंदिगड महानगरपालिका निवडणुकीतील विजयाने ‘आप’चा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.

हेही वाचा:

कराड : डोक्यात दगड घालून युवतीचा खून

एकीसोबत प्रेमाच्या आणाभाका अन् दुसरीशी विवाह करणाऱ्या प्रियकराला मंडपातून उचललं

 

Back to top button