नंदुरबार: डंपरच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार, अपघात घटनांमध्ये वाढ | पुढारी

नंदुरबार: डंपरच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार, अपघात घटनांमध्ये वाढ

नंदुरबार ; पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार जिल्ह्यातील साक्री रस्त्यावर डंपरच्या धडकेत दोन तरुण जागीच ठार झाले. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळू डंपरने धडक दिल्याने अनिल युवराज माळी आणि संकेत मदन चौधरी (वय २१) दोन्ही (रा. ठाणेपाडा) हे नंदुरबार जिल्ह्यातील दोन तरुण जागीच मरण पावले.

जिल्ह्यात साक्री रस्त्यावर दर चार सहा महिन्याच्या अंतराने वाळू डंपरखाली चिरडून ठार होण्याच्या घटना क्रमाने घडत आहेत.

अधिक वाचा : 

जिल्हा प्रशासनाने याबद्दल ठोस पाऊल उचलले नसल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत. दरम्यान हा अपघात १५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता साक्री रोडवरील नर्सरीच्या रस्त्यावर घडला.

एमएच- १५ जीव्ही-८७७९ डंपरवरील चालकाने नंदुरबारकडून साक्रीकडे वाळू वाहतूक करीत असताना रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने दामटली.

अधिक वाचा : 

तेव्हा छडवेलकडून ठाणेपाडाकडे येणाऱ्या एम एच-१८ टी-८६३९ क्रमांकाच्या मोटरसायकलला जबर धडक दिली.

त्यामुळे बाईक चालविणारा संकेत चौधरी व मागे बसलेला अनिल गवळी हे गंभीररित्या जखमी होऊन जागीच मरण पावले.

अधिक वाचा : 

दरम्यान चालक घटनास्थळावरून पळून गेला. मृत पावलेल्या नातेवाईकांमधील सुनिल माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातचालका विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कैलास माळी करीत आहेत.

Back to top button