धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील वणी बायकोचे दुसरे लग्न लावून देणार असल्याच्या संशयातून नवऱ्याने चुलत मेहुण्याचा धारदार कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना आज ( दि. १४ ) घडली आहे.
मारेक-यास अवघ्या एका तासात धुळे तालुक्यातील जापी शिवारातून पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने कोयत्यासह ताब्यात घेतले आहे.
धुळे तालुक्यातील वणी येथे रहाणारे केवलसिंग पावरा यांच्या लहान मुलीच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नासाठी राजू रामसिंग बारेला उर्फ पावरा हा देखील आला होता.
याचबरोबर केवलसिंग यांचा जावाई काशीराम बारेला हा देखील आला होता.
अधिक वाचा :
गेल्या काही महिन्यांपासून काशीराम याच्या जाचाला कंटाळून त्याची पत्नी वणी येथे माहेरी आली होती. त्यातच तिच्या लहान बहीणीचे लग्न झाले होते.
अशा स्थितीत तिचे देखील दुसरे लग्न लावून देण्यासाठी सासरचे लोक प्रयत्न करीत असल्याचा संशय काशीराम याला होता.
या रागातून त्याने दोन दिवसांपासून सासरच्या लोकांना शिवीगाळ करणे सुरु ठेवले होते. दरम्यान आज राजू रामसिंग बारेला हा त्याच्या भावाकडे जापी शिवारातील एका शेतात गेला होता.
त्याच्या पाठोपाठ कांशीराम हा देखील जापी शिवारात गेला.
यावेळी कांशीराम पावरा याची समजूत घालून त्याला भैया पावरा आणि राजू पावरा यांनी धुळे येथील वणीमध्ये घेवून जाण्यासाठी निघाले.
पण वाटेत कांशीराम याने राजू पावरा याच्या गळयावर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. वार वर्मी लागल्याने राजु रामसिंग पावरा हा खाली कोसळला.
अधिक वाचा :
ही घटना पहाताच भैया पावरा याने पलायन केले. तर भैया याला ठार करण्यासाठी कांशीराम याने जापी शिवारातील शेतांमध्ये त्याचा शोध सुरु केला.
दरम्यान ही माहीती कळाल्याने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक सागर काळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
यापथकाने जापी शिवारात शोध मोहीम राबवत आरोपी कांशीराम पावरा याला तातडीने खुनात वापरलेल्या हत्यारासह ताब्यात घेतले आहे.
त्याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ