Baby girl welcome : लेक आली घरा, स्वागताचा थाट-माट न्यारा | पुढारी

Baby girl welcome : लेक आली घरा, स्वागताचा थाट-माट न्यारा

निफाड (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

 मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, असे मानणाऱ्या समाजात पुत्र जन्माचे सोहळे धुमधडक्‍यात साजरे केले जातात. मात्र आता समाज बदलू लागला आहे. आम्हाला मुलगी हवी, म्हणणार्‍या लोकांची संख्याही वाढू लागलीय.मुलगी झाली की नाक मुरडणारी लोक आता मुलीच्या जन्माचे स्वागत (Baby girl welcome) करू लागले आहेत. धुमधडक्‍यात मुलीच्या जन्माचे सोहळे होऊ लागले आहेत. नुकतचं याचे प्रत्यंतर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील भवर कुटुंबात पाहायला मिळाले.

 मुलगी झाली… घरी दिवाळी साजरी केली

निफाड तालुक्यातील नैताळे खेड्यातील भवर यांच्या परिवारात नुकतचं एक कन्या प्राप्त झाले. घरात कन्याप्राप्त झाल्‍याचे समजताच  घरात अक्षरश: दिवाळी साजरी करण्‍यात आली.   आपल्या मुलीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. (Baby girl welcome) फटाक्यांचा दणदणाट, वाजंत्री, भजन, कीर्तन आणि सहभोजन यांचा एकच थाट भवर परिवाराने उडवून दिला होता. सडा, रांगोळी, फुलांचा गालिचा हे सारे काही एखाद्या राजकन्ये प्रमाणे तिचे स्‍वागत करण्‍यात आले.  याची एकचं चर्चा परिसरात हाेत आहे.
भवर कुटुंबातील तीन भावांना मिळून एकच कन्यारत्न होते. तिच्या विवाहानंतर त्यांच्या तिसऱ्या पिढीतील शंकर बाबुराव भवर यांचे सुपुत्र नकुल व स्नुषा स्वाती यांना कन्यारत्नाची प्राप्ती  झाली. पहिलीच कन्या जन्माला आली असल्याने भवर परिवाराचा  आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ : काेल्‍हापुरात घडतेय मेरी काेम 

 

Back to top button