Swapnil Joshi's New Look : तुला पण रणवीर सिंहची सवय लागली काय?  | पुढारी

Swapnil Joshi's New Look : तुला पण रणवीर सिंहची सवय लागली काय? 

पुढारी ऑनलाईन डेस्क:

 
मराठी इंडस्ट्रीमधील चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी आपला अभिनय, ड्रेसिंग आदी कारणांनी नेहमी चर्चेत असणारा अभिनेता आहे.  स्वप्नील  (Swapnil Joshi) बर्‍याच वेळा आपल्या ड्रेसिंगमूळे (Swapnil Joshi’s New Look) ट्रोल होत असतो. आतापर्यंत त्याला बऱ्याचवेळा ट्रोल केले गेलेआहे. त्याने नुकतचं अतरंगी ड्रेसस्टाइलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Swapnil Joshi's New Look
हिंदी असो या मराठी सेलिब्रिटी कोणत्या ना कोणत्या कारणांनी सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. त्यांची अतरंगी ड्रेसस्टाइल, हेअरस्टाइल, वक्तव्य अशा बर्‍याच कारणांनी सोशल मीडियावर ट्रोल होत असतात.
Swapnil Joshi's New Look

Swapnil Joshi’s New Look अतरंगी ड्रेसस्टाइल 

अभिनेता स्वप्नील जोशी त्याच्या अतरंगी ड्रेसस्टाइलमूळे नेहमी चर्चेत असतो. स्वप्नील सोशल मीडियावर सक्रिय असतो. वेगवेगळ्या अंदाजातील तो फोटो शेअर करत असतो. नुकतचं त्याने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताच सोशल मीडिया युजर्संनी त्याच्यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. स्वप्नीलने या फोटोमध्ये हटके अशी पॅन्ट आणि टी शर्ट घातला आहे. आणि या ड्रेसअपला साजेसा असे शूजही घातले आहेत. हा लूक पाहून युजर्सनी कमेंटचा वर्षाव  केला आहे.
Swapnil Joshi's New Look

आमच्याकडे गोधडी म्हणतात…

अशा रंगांचा बॉल मी खेळण्यातला पाहिला होता. चुकून एकत्र कपडे धुवायला टाकले होते का?, याला आमच्याकडे गोधडी म्हणतात…, पोतराज जोशी…, आपल्या संस्कृतीत सदरा-कुर्ता छान दिसतो. हा ड्रेस सतरंजी सारखा वाटतो सर…, अरे यार तुला पण रणवीर सिंहची सवय लागली की काय?, या पोशाखात ड्रेस डिझायनरच्या प्रत्येक फटकार्‍यातून वेगवेगळी रंगछटा उतरली आहे…, सरडा.., कारे स्वप्नील एवढी ठिगळं का वापरली आहेस ड्रेस शिवण्यासाठी…, कहॉं से लेकर आते हैं इतनी सारी चिंधी.., स्वप्नील दादा मराठी मधले रणवीर सिंह (Ranveer Singh) वाटत आहात, अशा कमेंट्स त्याच्या फोटोंवर केल्या आहेत.
Swapnil Joshi's New Look
स्वप्नील त्याच्या ड्रेसिंगमूळे जरी ट्रोल होत असला तरी त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केले आहे. अनेक मालिका, चित्रपटात, वेबसीरिजमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. तुकाराम, दुनियादारी, तू ही रे, मुंबई-पुणे-मुंबई (१,२,३) या चित्रपटातील त्याच्या भूमिका खूप गाजल्या. समांतर वेबसीरिजमधील त्याच्या अभिनयाची चर्चा झाली.  
Swapnil Joshi's New Look
हेही वाचा;

कोल्हापूरचा अंध पैलवान गाजवतोय मोठ-मोठी मैदानं

Back to top button