Aryan Khan Bail : आर्यन खानच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा ‘एनसीबी’चा विचार | पुढारी

Aryan Khan Bail : आर्यन खानच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा 'एनसीबी'चा विचार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

अंमली पदार्थ प्रकरणात अडकलेला सिनेस्टार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार अंमलीपदार्थ विरोधी खाते (एनसीबी) करीत आहे. एनसीबीमधील सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच आर्यन खान (Aryan Khan Bail : ) याला जामीन मंजूर केला हाेता.

आर्यन खान याच्यासोबतच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना असलेल्या गोव्याकडे निघालेल्या जहाजावर अमली पदार्थ जवळ बाळगल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. एक लाख रुपयांच्या वैयक्तिक बॉण्डवर या सर्वांना गेल्या 28 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने जामीन ( Aryan Khan Bail : ) दिला होता. वरील आरोपीविरोधात ठोस पुरावे नसल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात केली होती. आर्यन खान याच्याकडे अमली पदार्थ नव्हते तरी इतर दोन आरोपीजवळ किरकोळ प्रमाणात अमली पदार्थ होते, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. आता आदेशाविरोधात दाद दाद मागण्याचा विचार अंमलीपदार्थ विरोधी खाते (एनसीबी) करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Aryan Khan Bail : आर्यन खानविरुद्ध अपराधजन्य पुरावे नाहीत : उच्च न्यायालय

आर्यन खान याला जामीन मंजूर करताना उच्‍च न्यायालायाने म्हटले होते की, आर्यन खान याच्या विरुद्ध अपराधजन्या पुरावे नाहीत. आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडलेले नाही. तसेच आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मनुमुन धमेचा यांनी एकत्र येत बेकायदेशीर रित्या ड्रग्ज घेऊन गुन्हा करण्याची योजना आखली होती, असे कोणतेही पुरावे आढळत नाही. फक्त क्रूझवर फिरण्याच्या आधारावर कोणावरही आरोप लावता येणार नाही. तसेच आर्यन खान याच्या व्हॉटसअप् चॅटमध्ये देखिल काही आक्षेपार्ह असे आढळलेले नाही. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट व मुनमुन धमेचा हे एकत्र होते, असा कोणताही पुरावा नाही. तसेच मुनमुन धमेचा हिचा कडून जे ड्रग्ज मिळाले आहे ते विक्री करण्यात इतके नाही त्यामुळे या लोकांचा ड्रग्ज विक्रीची योजना होती अशी कोणतीही शक्यता वाटत नसल्‍याचेही न्‍यायालयाने म्‍हटले होते.

कोर्ट पुढे म्हणाले, एनसीबीने घेतलेल्या आरोपींच्या जबाबास आधार धरता येणार नाही. तपास अधिकाऱ्यांसमोर आरोपींचे जबाब रेकॉर्ड करण्यात आले आहे त्याला ग्राह्य धरता येणार नाही, असेही उच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले होते.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button