प्रियांका चोप्रा हिने असं काय केलंय ज्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरुयं

प्रियांका चोप्रा हिने असं काय केलंय ज्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरुयं
Published on
Updated on

प्रियांका चोप्रा हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आपल्या नावातील जोनास हे नाव हटवले. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. तिने घटस्फोट घेणार असल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत. पण याबाबत अजुनही प्रियांकाने माहिती दिलेली नाही.

लग्नानंतर प्रियांका चोप्रा तिचे नाव 'प्रियांका चोप्रा जोनास' असे लिहायची, यातून तिने आता जोनास काढून टाकले आहे. दरम्यान, #NickJonas, #PriyankaChopra असा ट्विटरवर ट्रेंड सुरु झाला आहे. सोशल मीडियावर लोक मजेदार मीम्स शेअर करत आहेत.

प्रियांकाने जोनास आडनावासह तिचे चोप्रा आडनावदेखील हटवलंय. तिने इन्स्टाग्रामवर केवळ प्रियांका असे नाव ठेवलंय. प्रियांका आणि निकच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच्या ते वेगळे होत असल्याचं वृत्त पसरत आहे. दरम्यान, प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी, प्रियांका हिच्याबाबतीत जे काही वृत्त पसरले आहे ती केवळ अफवा असल्याचे म्हटलंय. दोघांमध्ये सगळे काही चांगले चालले आहे. दोघे सोबत राहून खूप खुश आहेत, असा खुलासा त्यांनी केलाय.

प्रियांकानं जोनास नाव हटविल्यामुळे तिच्या चाहत्यांना वाटू लागले आहे की, दोघांच्या नात्यात दुरावा आला असून ते वेगळे होणार आहेत. याच दरम्यान, निक जोनासनं इन्स्टाग्रामवर आपल्या वर्कआउटचा एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तो हार्ड वर्कआउट करताना दिसतोय. त्याच्या या व्हिडिओवर स्वतः प्रियांकानं कमेंट केलीय. " तू जवळ असतानाच मला मृत्यू यावा…" Damn! I just died in your arms… ? ? ❤️ अशी कमेंट करत प्रियांकानं हार्ट इमोजी शेअर केलाय. तिच्या या कमेंटमुळे ती निक पासून वेगळे होऊ शकत नाही, असेच संकेत मिळत आहेत. अनेकांनी या कमेंटला लाइक्स केलंय.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news