जळगाव हत्याप्रकरण : सुनील टेमकर हत्येप्रकरणी ३ अल्पवयीन संशयित ताब्यात | पुढारी

जळगाव हत्याप्रकरण : सुनील टेमकर हत्येप्रकरणी ३ अल्पवयीन संशयित ताब्यात

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

येथील चौगुले प्लॉट परिसरातील सलून व्यवसायिक सुनील सुरेश टेमकर (वय ३६) याची अज्ञात मारेकर्‍यांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना काल (दि. 21)रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी ३ अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. यापैकी एक आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यापैकीच एकाने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती आहे. (जळगाव हत्याप्रकरण)

ही घटना घडल्यानंतर सुनीलचे दोन भाऊ आणि नागरिकांनी सुनिलला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र आज सकाळी ९ वाजेपर्यंत या घटनेची माहिती घरातील कोणालाही दिलेली नव्हती. आज अचानक याबाबतची माहिती त्यांना देताच सुनीलची आई आणि पत्नीला धक्काच बसला. (जळगाव हत्याप्रकरण)

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव ते ममुराबाद रस्त्यावर प्रजापत नगर येथील सुनील टेमकर यांचा, चौगुले प्लॉट परिसरात सलूनचा व्यवसाय आहे. काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांचे दुकान बंद होते. त्यानंतर काल रविवारी त्यांनी दुकान पुन्हा उघडले असता, दुकान बंद करतेवेळी २ अनोळखी व्यक्तींनी दुकानात येऊन त्यांच्याकडे ब्लेड मागितले. त्यावेळी त्यांना ब्लेड देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. (जळगाव हत्याप्रकरण)

या वादात संतापलेल्या दोघांनी सुनिलवर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी सुनिलला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी घोषित केले. या घटनेचा घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा :

Back to top button