राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्षपदी अंबादास खैरे यांची फेरनिवड | पुढारी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्षपदी अंबादास खैरे यांची फेरनिवड

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी अंबादास खैरे यांची नाशिक शहराध्यक्ष पदावर फेरनिवड करण्यात आली. याबाबतची घोषणा आज (दि.५) मुंबई एज्युकेशन ट्रस्ट येथे झालेल्या बैठकीत केली.

अंबादास खैरे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे नाशिक शहराध्यक्ष राहणार असून त्यांच्या फेरनिवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिले आहे. आज बांद्रा येथील आज मुंबई एज्युकेशन ट्रस्ट येथे पार पडलेल्या बैठकीवेळी ही घोषणा करण्यात आली. खैरे हे तिसऱ्यांदा युवक शहराध्यक्ष पदावर कायम राहत असून उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ यांनी खैरे यांनी नाशिक शहरात केलेल्या कामांची पद्धत व पक्षवाढीकरिता घेतलेल्या निर्णयाची दखल घेत त्यांची युवक शहराध्यक्ष पदावर फेरनिवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

अंबादास खैरे यांची युवक शहराध्यक्ष पदी फेरनिवड झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खैरे यांचे अभिनंदन केले असून सामाजिक कार्यासोबत पक्षवाढीसाठी सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सोबत घेणार असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button