जळगाव : एकाच पक्षातील नगरसेवकांचे वेगवेगळे गटनेते-नितीन लढ्ढा | पुढारी

जळगाव : एकाच पक्षातील नगरसेवकांचे वेगवेगळे गटनेते-नितीन लढ्ढा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा :

आजच्या महापालिकेच्या विशेष सभेमध्ये एकाच पक्षाच्या नगरसेवकांची दोन वेगवेगळे गटनेते बनले. त्यामुळे कायदेशीर मुद्दे उपस्थित होत असल्याने महापालिकेची विशेष महासभा रद्द करण्यात आली, अशी माहिती माजी महापौर व नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी दिली.

आज महापालिकेमध्ये विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्या महासभेचा मुख्य विषय स्वीकृत नगरसेवक व स्थायी समितीमध्ये निवृत्त झालेल्या सदस्यांच्या ठिकाणी सदस्यांची निवड करणे हा होता. मात्र, त्यांनी विभागीय आयुक्तांचे पत्र ही दाखवले. गटनेतेपदी भगत बालाणी हेच आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या एका गटाने एडवोकेट पोकळे यांना गटनेतेपदी नेमणूक केली होती. याबाबत त्यांनी आयुक्त व विभागीय आयुक्त यांना पत्रदेखील दिले आहे.

२९ सदस्यांनी ही मागणी विभागीय आयुक्तांकडे केली होती. ती प्रलंबित असल्याचे लढ्ढा यांनी सांगितले.

आयुक्त किंवा विभागीय आयुक्त हे गटनेते पदाला मान्यताही देत नाहीयेत. हा पक्षांतर्गत पक्ष प्रश्न असल्याने त्यांच्या पक्षाने ठरवावे की नेमके गटनेते कोण आहेत? असे लढ्ढा म्हणाले. जोपर्यंत या गोष्टीचे कायदेशीर निराकरण होत नाही. तोपर्यंत ही सभा तहकूब करण्यात आल्याचेही  ते म्हणाले.

हेही वाचलं का? 

 

Back to top button