Accident: नांदूरशिंगोटे येथे अपघात, तीन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ठार - पुढारी

Accident: नांदूरशिंगोटे येथे अपघात, तीन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ठार

सिन्नर/नांदुरशिंगोटे : पुढारी वृत्तसेवा

नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे येथील चिपाचा नाला परिसरात मंगळवारी (दि.12) मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो व स्विफ्ट कार यांच्यात धडक होऊन एका औषध कंपनीतील तिघे मेडीकल रिप्रेझेंटिव्ह जागीच ठार झाले. भूषण बाळकृष्ण बधान (35 रा. पाथर्डी फाटा, नाशिक), शरद गोविंदराव महाजन (39, रा. म्हसरुळ, नाशिक), राजेशकुमार हरिशंकर तिवारी (36, रा. अंबरनाथ, कल्याण) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहे. ( three medical representatives death in accident on nashik pune highway )

ते तिघेही पुणे येथून नाशिककडे स्विफ्ट कारने (क्र. एमएच 15 टी.सी. 1721) येत होते. यातील शरद महाजन गाडी चालवत होते. नांदूरशिंगोटे येथे चिपाचा नाला परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या कार व आयशर टेम्पो (क्र. टीएस 30 टी 8886) यांच्यात अपघात झाला. महाजन यांच्यासह कारमध्ये बसलेले भूषण बधान, राजेशकुमार तिवारी या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती नांदूरशिंगोटे पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोडी बुद्रुक शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. वावी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Back to top button