धुळे जि. प. पोटनिवडणूक : शिरपूर तालुक्यात ८ जागांवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व | पुढारी

धुळे जि. प. पोटनिवडणूक : शिरपूर तालुक्यात ८ जागांवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व

धुळे; पुढारी वृत्तसेवा :

धुळे जिल्हा परिषदेच्या १४ गट व पंचायत समितीच्या २८ गणासाठी मतमोजणीची पूर्ण तयारी झाली आहे. मतमोजणी सकाळी १० वाजता सुरु होणार आहे. प्रशासन मतमोजणीला सज्ज झाले आहे.

धुळे जिल्हा परिषदेच्या १५ व पंचायत समितीच्या ३० जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली.माघारी अंती शिवसेनेने बोरकुंड गटातून शालिनी बाळासाहेब भदाणे या बिनविरोध आल्या. भाजपने शिरपूर तालुक्यातील विखरून गणातून विनिता मोहन पाटील व करवंद गटातून यातिष सुनील सोनवणे अशा २ जागा मिळवल्या.

उर्वरित जिल्हा परिषदेच्या १४ व पंचायत समितीच्या २८ जागांसाठी ७२.६७ टक्के मतदान झाले. आज मतमोजणीसाठी २० टेबलवर व्यवस्था करण्यात आलीय. २० राऊंड मध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी ३ ते ४ तास लागणार असल्याचा अंदाज आहे.

* लामकानी गटातून भाजपच्या धरती देवरे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. सुमारे 1500 मतांची ही आघाडी निर्णायक समजली जाते आहे.

*जि.प.चे माजी सभापती रामकृष्ण खलाणे यांना पराभवाचा धक्का

जिल्हा परिषदेच्या कापडणे गटामधून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामकृष्ण खलाणे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे माजी सभापती किरण पाटील यांनी 7 हजार 170 मते मिळवत विजय मिळवला आहे. खलाने याना 5907 मते मिळाली. याच गटातील न्याहळोद गणात राष्ट्रवादीचे युवराज पवार यांनी 2982 मते मिळवली.

भारतीय जनता पार्टीचे विकास पाटील यांचा पराभव केला आहे. विकास पाटील यांना 1780 मते मिळाली आहेत. फागणे गटामधून जिल्हा परिषदेचे भाजपचे माजी सदस्य अरविंद जाधव यांच्या सून अश्विनी भटू पवार यांना सहा हजार 278 मते मिळाली.

अश्विनी पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवार नयना रामचंद्र पाटील यांचा पराभव केला. नयना पाटील यांना 5190 मते मिळाली आहेत.

*शिरपूर तालुक्यात ८ जागांवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व

शिरपूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे आमदार अमरिशभाई पटेल यांचा करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. या तालुक्यातील सर्व ८ जागांवर भारतीय जनता पार्टीने निर्विवाद वर्चस्व मिळवले.

महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. आहे. यापूर्वी विखरण गणातून भाजपच्या विनिताबाई पाटील बिनविरोध झाल्या होत्या. करवंद गणातून यतिष सोनवणे हे बिनविरोध झाले होते.

आज मतमोजणी अंती अर्थे गणातून भाजपच्या संगीता पाटील, तराडी गटातून प्रतिभा भामरे, वनावल गनातून ममता चौधरी, जातोडा गनातून विठाबाई पाटील, शिंगावे गणातून चंद्रकांत पाटील, अजनाड गणातून रेखाबाई जाधव हे विजयी झाले आहे. शिरपूर तालुक्यात भाजपने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे.

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत शिंदखेडा तालुक्याचा गड माजी मंत्री जयकुमार रावल यांनी राखला आहे. रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. जिल्हा परिषदेच्या मालपुर गटातून महावीर रावल, खलाणे गट – पंकज कदम, नरडाणा गट – संजिवनी सिसोदे विजयी झाले आहेत. पंचायत समितीच्या दाऊळ गण – भारत ईशी, मेथी गण – रणजीत गिरासे हे विजयी झाले आहेत.

दरम्यान, नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालात भाजपच्या डॉ. सुप्रिया गावित; काँग्रेसच्या गीता पाडवी विजयी झाल्या आहेत.

नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र एडवोकेट राम रघुवंशी 3002 मतांनी कोपर्ल गटातून विजयी झाले आहेत. माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित हे पराभूत झाले. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे राम रघुवंशी यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद गमवावे लागले होते.

रनाळे गटात शिवसेनेच्या शकुंतला शिंत्रे 7097 मते घेऊन विजयी झाल्या.. रीना पाटील 5796 मिळून पराभूत झाल्या.

 

Back to top button