corona nashik : कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर मुलीसह पत्नीची आत्महत्या - पुढारी

corona nashik : कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर मुलीसह पत्नीची आत्महत्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोरोना (corona nashik) बाधित पतीच्या मृत्यूनंतर पतीचा विरह सहन होत नव्हता, त्यात ७ वर्षीय चिमुकली वडिलांची सतत आठवण काढत होती.  पप्पा जिकडे गेले तिकडे आपण जाऊ, असे तिने सांगितल्यानंतर आईने चिमुकलीसह गळफास घेत जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना येथे घडली.

सुजाता प्रविण तेजाळे (३६) व अनया प्रविण तेजाळे (७, दोघी रा. सुखसागर अपार्टमेंट, विनयनगर, नाशिक) असे या मायलेकीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. १) रोजी सुजाता व अनया यांनी चर्चा करुन आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्व चिट्ठीतून समोर आले आहे.

पतीचे कोरोनाने (corona nashik) निधन झाल्याचे धक्का

सुजाता यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. सुजाता यांचे दीर अशोक तेजाळे हे सुजाताच्या घरी गेले असता हा प्रकार उघडकीस आला.

आई बापाशिवाय अर्थ नाही आणि नवऱ्याशिवाय ही अर्थ नाही

‘जसा जन्म देताना त्रास झाला तसाच थोडं मन घट्ट करून हे करणार आहे. आणि हे करताना तिला सांगणार आहे की आपण पप्पांकडे चाललो. यात मी जन्मदेती वैरीण नाही. या जगात खूप वाईट आणि विचित्र लोक आहेत. म्हणून मी असा विचार करून तिला जसा जन्म दिला तसेच तिला घेऊन चालली’ आई बापाशिवाय अर्थ नाही आणि नवऱ्याशिवाय ही अर्थ नाही. असा मजकूर लिहून सुजाता यांनी आयुष्याचा शेवट केला.

हेही वाचा: 

Back to top button